Friday, November 15, 2024
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : काँग्रेसचे ७ तर शरद पवार गटाचे ५ आमदार अजितदादांच्या...

Ajit Pawar : काँग्रेसचे ७ तर शरद पवार गटाचे ५ आमदार अजितदादांच्या संपर्कात!

अमोल मिटकरींचा दावा; म्हणाले, युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत…

मुंबई : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आलेली असताना महाविकास आघाडी (MVA) मात्र अत्यंत दुबळी बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांत मविआच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी महायुतीत (Mahayuti) सामील होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मविआ पार खिळखिळी झाली आहे. त्यातच आता मविआतील आणखी काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक खुलासे केले.

अमोल मिटकरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश आहे, असं मिटकरी म्हणाले.

युगेंद्र, जोगेंद्र कोणीही येऊ देत आम्हाला फरक पडत नाही : अमोल मिटकरी

अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) याने शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता पुन्हा काका-पुतण्याची जोडी राजकारणात काय खळबळ माजवणार याची चर्चा सुरु आहे. त्यावर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा. पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -