Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीविरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी ६० हजार कोटींची तरतूद

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी ६० हजार कोटींची तरतूद

पाच तासांचा प्रवास दीड तासांत होणार पूर्ण

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीनेने कसली कंबर

अलिबाग : विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठीची अखेर १३ वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून, एमएमआरडीएने या कॉरिडॉरची मुळत:२०११मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने योजना केली होती; परंतु सप्टेंबर २०२० मध्ये त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)कडे सुपूर्द करण्यासाठीचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे विरार-अलिबाग कॉरिडॉर होण्याची आता चिन्हे दिसू लागल्याने हा कॉरिडॉर पूर्ण होताच जलदगतीने या मार्गावरून प्रवास होणार आहे. विरार ते अलिबाग या १२८ किमी लांबीच्या प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. मात्र

विरार-अलिबाग कॉरिडॉर पूर्णत्वास गेल्यास हा प्रवास केवळ दीड तासात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०१२मध्ये या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी फक्त १,२१५ कोटींचा खर्च अपेक्षित होता; परंतु आता यामध्ये दहापटीने वाढ झाली असून, हा खर्च २१ ते २२ हजार कोटींच्या घरात गेला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत १२ हजार ५५४ कोटी रुपये इतकी होती, तर २०२२ मध्ये ६० हजार ५६४ कोटी रुपयांपर्यंत म्हणजे पाचपटीने किंमत वाढली आहे. आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीने कंबर कसली असून, या प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्याचे काम सुरू केले आहे, दुसरीकडे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीने तयारीही सुरू केली आहे.

या नव्या वर्षात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या कॉरिडॉरचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यात मोरबे-करंजाडे या २० किमीच्या लांबीच्या कॉरिडॉरच्या बांधकामाचा श्रीगणेशा होणार असल्याचे समजले. विरार-अलिबाग हा १२७ कि.मी. लांबीचा कॉरिडॉर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या क्षेत्रातून जात आहे, तसेच हा रस्ता जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावा या ट्रान्सहार्बर लिंकलाही जोडला जाणार आहे. विरार-अलिबाग या कॉरिडॉर प्रोजेक्टची वैशिष्ट्ये लक्षात घेता, विरार ते अलिबाग दरम्यानच्या अनेक छोट्या-मोठ्या गावांना जोडणारा आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणारा असा हा मार्ग असणार आहे.

१६ लेनची ही ग्रीनफिल्ड महामार्गिका असून, या प्रकल्पातील दोन मार्गिका बस व अँम्ब्युलन्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ही ग्रीनफिल्ड महामार्गिका राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, ३, ४, ४ –बी, १७ भिवंडी बायपास व मुंबई – पुणे एक्सप्रेस-वे ला जोडली जाणार असून, मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस – वे मार्गालाही जोडणार आहे. या प्रकल्पाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गिकेत ४८ भुयारी मार्ग आणि ४१ पूल बांधण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या बांधकामाला आता सुरुवात होणार आहे. एमएमआरचा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरअखेरपर्यंत ८० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत प्रकल्पासाठी लागणारी संपूर्ण जमीन महापालिकेकडे असेल. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये सुमारे १२८ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. पालघरमध्ये सुमारे ९३ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. ठाणे आणि रायगडमध्ये भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. कॉरिडॉरचे बांधकाम २०२४च्या मध्यापर्यंत सुरू होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -