मुंबई: भारताचे हे ५ क्रिकेटर आता खेळाच्या मैदानावर खेळताना दिसणार नाहीत. या पाच खेळाडूंनी रणजी हंगामाच्या २०२३-३४च्या समापनासह क्रिकेटलाही अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्रिकेटर आहेत मनोज तिवारी, वरूण एरॉन, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी आणि फैज फजल. या खेळाडूंनी केवळ भारतासाठीच कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे तर डोमेस्टिक स्तरावरही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
बंगालचा दिग्गज मनोज तिवारी, झारंखडचा फलंदाज सौरभ तिवारी आणि वेगवान गोलंदाज वरूण एरॉन, मुंबईचा धवल कुलकर्णी आणि विदर्भचा फैज फजल, यांनी निवृत्ती घेण्याची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यात आयीएलसोबतचा करार नसणे तसेच राष्ट्रीय संघात जागा मिळण्याची आशा संपणे अशी आहेत.
वरूण एरॉन, मनोज तिवारी आणि फैज फजल यांनी त्याच मैदानावर अलविदा म्हटले जिथे त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली होती ३८ वर्षीय मनोज तिवारीने सोमवारी बिहारविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून देत अलविदा म्हटले. मनोज तिवारीने भारतासाठी १२ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
वेगवान गोलंदाज वरूण एरॉन तसेच सौरभ तिवारीयांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. सौरभ १७ वर्षे झारखंड संघाकडून खेळत आहे. त्याने भारतासाठी ३ वनडे सामने खेळले आहेत. तर वरूण एरॉन सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्यामुळे तो चांगली कामगिरी करू शकत नाही. त्याने भारतासाठी ९ कसोटी आणि तितकेच वनडे सामने खेळलेत. फैज फजल विदर्भकडून खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात विदर्भने २०१८मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. भारताकडून त्याने २०१६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केवळ एक वनडे सामना खेळला होता.
भारतासाठी १२ वनडे आणि २ टी-२० सामने खेळणारा धवल कुलकर्णीला आपल्या स्विंग मूव्हमेंट, तसेच जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जाते. मुंबईच्या या खेळाडूने १७ वर्षे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.