Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

भारताने निद्रिस्त राक्षस हा ठसा पुसून टाकला आहे- उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

भारताने निद्रिस्त राक्षस हा ठसा पुसून टाकला आहे- उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज भारताची सर्व क्षेत्रांमधील विकासाची उल्लेखनीय गाथा अधोरेखित केली. भारत आता केवळ त्याच्या अंगी असलेल्या क्षमतेसाठीच ओळखला जात नाही तर त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करणारा देश अशी ओळख भारताने अतिशय ठामपणे निर्माण केली, असे त्यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या(इग्नू) ३७व्या पदवीदान समारंभात बोलत होते. निद्रिस्त राक्षस ही ओळख पुसून टाकलेल्या भारतामधून ते पदवी मिळवत आहेत, असे उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना सांगितले.


देशातील पोषक परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपतींनी त्यांना आवाहन केले, “या असामान्य चालनेचा लाभ घ्या, पारदर्शकतेचा उपयोग करा, आर्थिक भरभराटीचा फायदा करून घ्या आणि संधींचे वैयक्तिक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये रूपांतर करा.”





नवी दिल्लीत झालेली जी-२० शिखर परिषद म्हणजे भारताच्या नेतृत्वाचा दाखला असल्याचा संदर्भ देत, उपराष्ट्रपतींनी नमूद केले की भारताच्या समावेशकता आणि सहभागाप्रति बांधिलकीचा सूर कशा प्रकारे जगभरात घुमत आहे.


सातत्याने बदलत राहणाऱ्या तंत्रज्ञानात नवे कल येत राहतात आणि त्यांचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या जगात त्यांचा प्रवेश होत आहे याची आठवण करून देत उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना भारत@२०४७ चे खरे पाईक होण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.





इग्नूचे कुलगुरु प्रो. नागेश्वर राव, प्र-कुलगुरू प्रो. उमा कांजीलाल आणि प्रो. सत्यकाम आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment