Sunday, September 14, 2025

IND vs ENG: रांची कसोटीआधी टीम इंडियासाठी खुशखबर, टीम इंडियात या सुपरस्टार खेळाडूचे पुनरागमन

IND vs ENG: रांची कसोटीआधी टीम इंडियासाठी खुशखबर, टीम इंडियात या सुपरस्टार खेळाडूचे पुनरागमन

मुंबई: भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. येथे इंग्लंडने हैदराबाद कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीत विजय मिळवला. आता दोन्ही संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. रांची कसोटीआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर येत आहे.

राहुल दुखापतीतून सावरला

स्टार फलंदाज केएल राहुलचे या चौथ्या सामन्यात पुनरागमन होऊ शकते. राहुलला क्वाड्रिसेप्समध्ये दुखापत झाली होती. यातून तो सावरला आहे. राहुल आपल्या उजव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने गेल्या आठवड्यात ९० टक्के फिटनेस मिळवला होता.

यातच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघ मंगळवारी रांचीसाठी रवाना होईल. या कसोटीत बुमराहला आराम मिळण्याची शक्यता आहे. राहुल फिटनेस मिळवण्याच्या जवळ आहे आणि त्याचा संघात समावेश होईल याची शक्यता आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला पुढील दोन कसोटी सामने खेळता आले नव्हते. बुमराहबाबत बोलायचे झाल्यास पाच सामन्यांच्या या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यात १७ विकेट घेतले आहे. भारत सध्या या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे.

भारताचे पुढील कसोटी सामने

चौथा कसोटी सामना - २३-२७ फेब्रुवारी, रांची पाचवा कसोटी सामना, ७-११ मार्च, धर्मशाला

Comments
Add Comment