Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीDeepika Padukone : दीपवीर होणार आईबाबा? दीपिका 'त्या' साडीमध्ये करतेय बेबी बंप...

Deepika Padukone : दीपवीर होणार आईबाबा? दीपिका ‘त्या’ साडीमध्ये करतेय बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न?

नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) ही जोडी प्रचंड प्रसिद्ध आहे. २०१८ मध्ये ते लग्नबंधनात अडकले, तेव्हापासून त्यांना ‘दीपवीर’ या नावाने ओळखले जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली असून आता दीपवीर (Deepveer)आईबाबा होणार की काय या चर्चेला उधाण आलं आहे. निमित्त ठरलं ते बाफ्ता (BAFTA) सोहळ्याचं. या सोहळ्यात दीपिकाने नेसलेल्या साडीत ती बेबी बंप (Baby bump) लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय अनेक मीडिया रिपोर्टमध्ये ती दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये असल्याचा म्हणजेच प्रेग्नंसीला १२ आठवडे उलटल्याचा दावा करण्यात आला आहे.

अलीकडेच दीपिकाने BAFTA मध्ये हजेरी लावली होती, त्यानंतर ती गरोदर असल्याची जोरदारी चर्चा रंगली. ‘द वीक’च्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दीपिका-रणवीरच्या एका जवळच्या व्यक्तीने अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘दीपवीर’ लवकरच ही गुड न्यूज देतील. अभिनेत्री सध्या दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये असल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.

मात्र दीपिका किंवा रणवीर यांच्याकडून या प्रेग्नन्सीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिवाय दीपिका ज्याप्रकारे तिच्या कामामध्ये सक्रिय आहे, त्यावरुन ती सध्या दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये हे सांगणेही कठीण आहे.

दीपवीरला आहे मुलांची आवड

दरम्यान काही महिन्यांपूर्वी दीपिकाला ‘वोग सिंगापूर’च्या मुलाखतीत मुलांविषयी काही विचार करत आहात का, असे विचारण्यात आले होते. त्यावर दीपिका म्हणाली होती की, ‘हो नक्कीच, रणवीर आणि मला मुलं खूप आवडतात. आमच्या एका कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -