अशोक चव्हाणांची विजय वडेट्टीवारांवर टीका
मुंबई : मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधीमंडळात एकमताने मंजूर झाले. आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने (Maharashtra Government) सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ केलंपप. त्यानुसार मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, विधेयकाला मंजूरी दिल्यानंतरही हे फसवं सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. त्यावर नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात पक्षप्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पुन्हा एकदा सरकारने मराठा समाजाची फसगत केली आहे. मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरु असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, आज विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतोय ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चितच टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असं माझं मत नाही. पण एखादं चांगलं होत असताना कुणी अपशकुन करू नये, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवारांवर केली आहे.