मुंबई: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा आईबाबा बनले आहेत. अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती खुद्द अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली. अभिनेत्रीने सांगितले तिने १५ फेब्रुवारीला आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले. इतकंच की पोस्टमध्ये अनुष्काने मुलाचे नावही सांगितले.
अनुष्का शर्माने पोस्टमध्ये लिहिले, भरपूर आनंद आणि प्रेमभऱ्या मनाने आम्हाला सगळ्यांना हे सांगण्यात आनंद होत आहे की १५ फेब्रुवारीला आम्ही आमचे बाळ अकाय आणि वामिकाच्या छोट्या भावाचे या जगात स्वागत केले आहे. आम्ही आमच्या या सुंदर काळात तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांचा स्वीकार करतो. आमच्या प्रायव्हसीची इज्जत कराल यासाठी रिक्वेस्ट करत आहोत. प्रेम आणि आभार.
View this post on Instagram
बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या प्रेग्नंसीच्या चर्चा
बऱ्याच दिवसांपासून अनुष्का शर्माच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबाबत चर्चा सरू होत्या. अनेक दिवसांपासून अभिनेत्री लोकांसमोरही आली नव्हती. मात्र अनुष्का शर्माने आपल्या प्रेग्नंसीबाबत गुप्तता पाळली होती. विराटनेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, कोहलीचा माजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सहकारी एबी डे विलियर्सने याचा खुलासा केला होता की हे जोडपे दुसऱ्या बाळाचे वेलकम करत आहे.
जोडप्याने मुलाचे नाव ठेवले अकाय
आता अनुष्का शर्माने खुद्द कन्फर्म केले की ती एका मुलाची आई बनली आहे. तसेच वामिकाला छोटा भाऊ मिळाला आहे. याचे नाव अकाय ठेवले आहे.