Sunday, May 11, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांच्यासह जेपी नड्डांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांच्यासह जेपी नड्डांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, एनसीपीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे या ६ जणांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.


आज अर्थात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत या ६ जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या कालावधीत ना कुठले नवे नामांकन आले ना कुणी आपले नाव मागे घेतले. यामुळे या ६ खासदारांची नावे राज्यसभेसाठी बिनविरोध पक्की झाली आहेत. यात भारतीय जनता पक्षाच्या तीन, तर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा समावेश आहे.


गुजरातमधून जे पी नड्डा राज्यसभेवर


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची गुजरातमधून राज्यसभेसाठी निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपमध्ये गुजरातचे महत्व पूर्वीच्या तुलनेत खूप अधिक वाढताना दिसत आहे.


राजस्थानातून सोनिया गांधी यांची बिनविरोध निवड


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची राजस्थानातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय, भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च सभागृहात बसण्याची सोनिया गांधी यांची पहिलीच वेळ असणार आहे.


मध्य प्रदेशातून या नेत्यांची निवड


मध्य प्रदेशातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपचे एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नारोलिया, बंसीलाल गुर्जर, तर काँग्रेसचे अशोक सिंह यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment