Monday, May 12, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Shivjayanti : शिवनेरी गडावर शिवजयंती सोहळ्याचा मोठा उत्साह, शिवभक्तांची मोठी गर्दी

Shivjayanti : शिवनेरी गडावर शिवजयंती सोहळ्याचा मोठा उत्साह, शिवभक्तांची मोठी गर्दी

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचे दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९४वी जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीनिमित्त विविध सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरही शिवजयंती सोहळ्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे.


शिवजयंतीचा सोहळा शिवनेरी गडावर पार पडत आहे. यासाठी शिवभक्तांनी या गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रीही या शिवजन्मसोहळ्यात सहभागी होणार आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी सोहळ्यानिमित्त गडावर रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा आयुक्त कुलकुलवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत झाली.


शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाई देवराई आणि वन उ्द्योगाचे लोकार्पण होणार आहे. तसेच गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांसाठी टूव्हीलर आणि चारचाकी गाड्यांसाठी पार्किंग एरिया वाढवण्यात आला आहे.


Comments
Add Comment