मुंबई: पिस्ता(pista) एक शानदार ड्रायफ्रुट आहे. तुम्ही हे असेच खाऊ शकता अथवा दूध अथवा एखाद्या गोष्टीसोबत मिसळून खाल्ल्याने याचा स्वाद दुपटीने वाढतो. सण, उत्सवादरम्यान अथवा लग्नसोहळ्यादरम्यान गिफ्टमध्ये ड्रायफ्रुट्स एकमेकांना दिले जातात. कोणाला रोस्टेड पिस्ता आवडतात तर कोणाला साधे. पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दिवसभरात किती पिस्ता खाल्ले पाहिजेत.
पिस्ता खाऊन तुम्ही तब्येत सुधारू शकता. ३ ते १५ वर्षाच्या मुलांसाठी १५-२० पिस्ता खाल्ले पाहिजेत. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यामुळेच तुम्ही मुलांना दररोज पिस्ता देऊ शकता. याशिवाय पिस्तामुळे वजन वाढते. मांसपेशी सुधारतात, डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच झोपेसाठीही फायदा होतो.
सकाळच्या वेळेस रिकाम्या पोटी पिस्ता खा. जर तुम्ही दररोज पिस्ता खाण्याचा विचार करत असाल तर रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. कारण भिजलेले पिस्ता खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.
उन्हाळ्याच्या दिवसांत पिस्तान खाऊ नये. कारण पिस्ते उष्ण असतात. एका दिवसांत १५ ते २० ग्रॅम पिस्ता तु्म्ही खाऊ शकता. कारण जास्त खाल्ल्याने आरोग्यास त्रास होऊ शकतो.