नूरिस्तान: अफगाणिस्तानच्या नूरिस्तान प्रांतात भूस्सखलन झाल्याने तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय नूरगाराम जिल्ह्यात भूस्सखलनामुळे साधारण १० जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. सूचना आणि संचार प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी या घटनेची माहिती देत सांगितले की नूरगाराम जिल्ह्याच्या नकराह गावांत जोरदार पावसामुळे अनेक डोंगर कोसळले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १५ ते २० घरांचे नुकसान झाले आहे.
Afghanistan: 25 killed, 10 injured in landslide in Nuristan province
Read @ANI Story | https://t.co/jbJ6r7me2w#Afghanistan #landslide #Nuristan pic.twitter.com/FY2BRp8MHz
— ANI Digital (@ani_digital) February 19, 2024
पावसामुळे नूरिस्तान, कुनार आणि पंजशीर प्रांतातील रस्ते खचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजशीर प्रांतात हिमस्सखलन झाले आहे. यामुळे ५ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत.
पंजशीरच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी २ जणांचा आधीच मृत्यू झाा आहे. अफगाणिस्तानात वारंवार भूस्सखलन तसेच हिमस्सखलनाच्या घटना घडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवित तसेच वित्तहानी होत आहे.
नैसर्गिक आपत्तीशिवाय लडखडणारी अर्थव्यवस्थाही चिंतेचा विषय बनला आहे. येथील नागरिकांना आपली गुजराण करण्यात अनेक समस्या येत आहे.