Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीAaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची अवस्था गल्लीबोळातल्या नेत्यांसारखी!

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची अवस्था गल्लीबोळातल्या नेत्यांसारखी!

मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विधानसभा निवडणुकीचे चॅलेंज देणे हास्यास्पद : शंभूराज देसाई

मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना ‘तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार आहे’, असं थेट आव्हान दिल्यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील आदित्य ठाकरेंवर सणसणीत टीका केली.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कोणतेही भांडवल शिल्लक राहिले नाही. गल्ली बोळातील नेत्यांसारखी त्यांची अवस्था झाली आहे. आता केवळ म्याव म्याव करण्याचे ते काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

शंभूराज देसाईंची आदित्य ठाकरेंवर टीका

काल आदित्य ठाकरे यांची कोपरा सभा झाली. खूपच धाडसी विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आश्चर्यकारक विधान उबाठा गटाचे युवराज यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या चार कोपरा सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाहीत. आदित्य यांना जिंकण्यासाठी दोन विधान परिषदेच्या जागा द्याव्या लागतात आणि नंतर निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -