Thanks giving day : कृतज्ञता...


  • हलकं-फुलकं : राजश्री वटे


रोज सकाळी उठल्याबरोबर प्रथम देवाचे आभार मानायला पाहिजेत की, आजचा सूर्योदय बघायला मिळतो आहे, चांगले आरोग्य लाभले आहे, आजचा दिवस खूप आनंदात जाणार आहे. यांसारख्या अनेक सकारात्मक गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करायची, देवा... तुझ्यामुळेच!



नोव्हेंबर महिन्यात परदेशात “Thanks giving day” साजरा करतात. खरंच, भारी वाटली ही कल्पना! व्यक्त होणं... दुसऱ्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं... किती छान कृती आहे. पूर्वी असं व्यक्त होणं वगैरे म्हणजे औपचारिकता वाटत असे, पण आजकाल समोरच्या व्यक्तीबद्दल असलेली भावना बोलून दाखवणे म्हणजेच व्यक्त होणे प्रचलित झाले आहे आणि त्यात वावगं नाहीच मुळी... एक सुंदर संकल्पना आहे ती! आचरणात आणलीच पाहिजे, स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी सुद्धा...



समोरच्याने सकारात्मक काही केले की लगेच दुसऱ्याकडून ‘Thank you’ म्हटलं जातं. खरं तर मराठी भाषेत धन्यवाद, आभारी आहे असे शब्द आपण वापरतो. पण Thank you मध्ये जे आहे ते आहे... ते ऐकताच एखादी व्यक्ती कितीही गंभीर असली तरी एक स्माईल देणारच... एव्हढी जादू आहे त्यात!



लहान मूल बोलायला लागलं की, त्याला दोन-चार मुख्य शब्दांमध्ये thank you शिकवलं जातं आणि बोबड्या बोलीत त्यानं म्हणायचं... केव्हढं कौतुक त्याचं.



आयुष्यात अनेक व्यक्ती येतात... जातात... जवळचे कायम हृदयात स्थान मिळवून असतात. पण त्याना गृहीत धरलं जातं, व्यक्त होणं राहून जातं, काही दूर निघून गेलेली असतात... कदाचित पुन्हा न भेटण्यासाठी... ज्या व्यक्ती काही काळाकरिता आयुष्यात येतात व जातात, तेव्हढाच संबंध येतो. पण बरंच काही शिकवून जातात, त्यांना Thanks दिले असतात का कधी... आठवून बघा?



म्हणूनच या “Thanks giving day”ची संकल्पना फार आवडली, वर्षातून एकदा हा दिवस येतो दुसऱ्याच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी! अवतीभवती असणाऱ्या सगळ्या वयाच्या, सर्व स्तराच्या व्यक्तींना असा आदर देणे, त्यांचा सन्मान करणे यांसारखी समाधानाची भावना दुसरी नाहीच आणि हे समाधान आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे... तत्काळ अमलात आणा, कृती करा व समाधान मिळवा!!

Comments
Add Comment

ध्येयप्रती निष्ठावान राहा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. आपल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? ती दूरदृष्टी, ते

वेळेचे महत्त्व

जीवनगंध : पूनम राणे शारदा विद्यालयात रेहान नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो इयत्ता दहावीला होता. अत्यंत नम्र,

कोकणचा शिमगा... काळजातली ओढ

संस्कृती : विभा मसुरकर  कोंकणात होळीला शिमगा म्हणतात. फाल्गुन पंचमीपासून अनेक ठिकाणी या उत्सवाला सुरुवात

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

स्मृतिपटल : अनिल रा. तोरणे प्रत्येक पित्याप्रमाणे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनाही वाटत असे की,

जंगलांच्या सहनशक्तीची कसोटी

पर्यावरण : मिलिंद बेंडाळे हवामान बदल हा केवळ तापमानवाढीचा प्रश्न नाही, तर ती परिसंस्थांच्या सहनशक्तीची कसोटी

एकादशीचे व्रत भद्रशील उपाख्यान

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्ये आहेत. प्रत्येक व्रत वैकल्याचे आपआपले