Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीShivrajyabhishek din : दांडपट्ट्याला मिळणार राज्यशस्त्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

Shivrajyabhishek din : दांडपट्ट्याला मिळणार राज्यशस्त्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

शिवराज्याभिषेक दिनाचा निवडला मुहूर्त

मुंबई : यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभिषेकाचे ३५०वे वर्ष आहे. या ३५० व्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) लंडनच्या संग्रहालयातून वाघनखे आणण्याचाही प्रयत्न करत आहेत. यानंतर शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek) एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. दांडपट्टा (Dandapatta) या महत्त्वपूर्ण शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar), सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला. त्याच दरबारात येत्या सोमवारी ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या घोषणांचा जयघोष होईल आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

कसा असतो दांडपट्टा?

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते आणि मुठीवर चढवता येणारे चिलखत जोडलेले असते. चिलखत पंजा, मूठ व कोपरापर्यंतचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषतः मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -