Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीShivarth Deore : भले शाबास! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सर केला शिवनेरी किल्ला

Shivarth Deore : भले शाबास! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सर केला शिवनेरी किल्ला

छत्रपती शिवरायांना अनोखे अभिवादन

देवळा : यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभिषेकाचे (Shivrajyabhishek) ३५०वे वर्ष आहे. या ३५० व्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत. शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri fort) १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात शिवजयंती (Shivjayanti) साजरी केली जाणार आहे. या उत्साहाच्या वातावरणात एका दीड वर्षाच्या चिमुकल्याने पराक्रम केला आहे. एवढ्या कमी वयात त्याने शिवनेरी किल्ला सर करत शिवरायांना अनोखे अभिवादन केले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला (Shivneri Fort) सर करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या (Nashik) उमराणे गावातील शिवार्थ उर्फ रायबा देवरे (Shivarth Deore) याने अनोखे अभिवादन केले. किल्ल्याच्या पायथ्यापासून तब्बल ६ तास २७ मिनिटे चालून शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळ गाठले. त्यामुळे रायबाचे सर्वच जण कौतुक करत आहेत.

रायबाचे वडील सचिन देवरे (Sachin Deore) आणि आई स्नेहल देवरे (Snehal Deore) यांनी रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला होता. त्यानुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा संकल्प त्यांनी पूर्ण केला.

कसा सर केला शिवनेरी किल्ला?

रायबाचा जन्म ६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या मूहूर्तावर झाला होता. त्याला लहानपणापासूनच शिवरायांबाबत विशेष प्रेम होते. त्याची ही ओढ लक्षात घेऊन वडील सचिन देवरे आणि आई स्नेहल देवरे यांन रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला.

यासाठी लागणाऱ्या सर्व कागदोपत्री परवानगींची त्यांनी पूर्तता केली. काही डॉक्टरांना सोबत घेतले. यापूर्वी काही दिवस रायबाचा चालण्याचा सराव करुन घेण्यात आला. त्यानुसार आई, वडील, डॉक्टर तसेच काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रायबाने शिवनेरीवर चढण्यास सुरुवात केली. तब्बल ६ तास २७ मिनिटात हा चिमुकला शिवनेरीवर पोहचला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्याठिकाणी असलेल्या विशेष पथकाने देखील त्याचे स्वागत करीत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला महल उघडून दिला. रायबाने देखील मोठ्या अदबीने आतमध्ये प्रवेश करीत त्या जागेला मानाचा मुजरा केला. परतीचा प्रवास एक तास ३७ मिनिटात रायबाने पूर्ण केला. रायबाने शिवनेरी सर केल्याने त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकजण त्याला भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -