Poem : काव्यरंग

आभाळाची आम्ही लेकरे


एका तुफानाच्या वेळी
रात्र पेंगुळली होती
जीर्ण-रंगीत गोधडी
खाली अंथरूण माती...

सटवाईच्या कुशीत
काट्या कुट्यातल जीणं
दैव-फासाची कुऱ्हाड
श्रम-कष्टाचं जगणं...

जीव आनंदून जाई
आग-पोटाची शमते
दोन-हात-दोन-पाय
उभ आयुष्य नाचते

बाप कोण पुसू नका
मायने जगविला गोळा
पायवाट ठिगळांची
भविष्याचा चोळा-मोळा...

स्वप्नं-गाठता उशाला
दिमतीला शीत-वारे
स्वैर छताखाली निजे
स्वप्रकाश देती तारे...

मुक्त-विहार-मनाचा
वाढे संचिताचे सार
निळ्या-सावलीत नांदे
खुल्या-आभाळी लेकर...

- पूजा अभय काळे, बोरिवली

खारूताई


खारूताई खारूताई
कुठे चाललीस घाई घाई
कामाशिवाय तुला
सुचत नाही का काही?

पाठीवर तुझ्या
किती गं पट्टेच पट्टे
एका जागी राहात नाही
म्हणून दिले का आईने रट्टे

चाहूल कुणाची लागता
लांब जाते पळून
पुन्हा पुन्हा पाहातेस
मागे मान वळून

दोन पायावर उभी राहून
दाखवितेस भारी तोरा
शोभून दिसतो तुला
रंग भुरा-भुरा

पळतांना हलवितेस
शेपूट झुपकेदार
पाहून तुझा भित्रेपणा
हसू येते फार

खारूताई - खारूताई
कर ना माझ्याशी दोस्ती
आपण दोघं मिळून
खूप करू मस्ती

- रवींद्र व्ही. चालीकवार, ता. महागाव, जि. यवतमाळ
Comments
Add Comment

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या