पुंडलिक पै, डोंबिवली
पै फ्रेंड्स लायब्ररीने २०१७ साली भारतातील पहिले पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन भरविले. वाचक आपल्या घरातील वाचून झालेली पुस्तके घेऊन येतात आणि त्याबदल्यात नाममात्र रु. १० प्रति पुस्तकामागे शुल्क देऊन प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या इतर वाचकांनी आणलेली पुस्तके निवडून घेऊन जातात. पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनामुळे वाचकांना दुर्मीळ पुस्तके हवी असलेली पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे हा उपक्रम वाचकांसाठी मेजवानी ठरलेला आहे. हा सोहळा १० दिवसांचा असून महाराष्ट्रातील अनेक वाचक या प्रदर्शनाला भेट देतात. या सोहळ्यासाठी वाचक आतुरतेने वाट पाहत असतात.
पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन हा सोहळ्यात दहा दिवस असून त्यात नवीन पुस्तकांची विक्री सुद्धा असते. त्याचप्रमाणे दहाही दिवस वाचकांसाठी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सुद्धा असते. चित्रपट, नाटक, मालिका अशा विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तीच्या मुलाखती, व्याख्याने आणि पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रमाची मेजवानी असते. या सोहळ्यासाठी दरवर्षी एक आगळा-वेगळा विषय आम्ही ठरवतो. (पु. ल. नगरी, ए. पी. जे. अब्दुल नगरी आणि विज्ञान आणि वैज्ञानिक)
पै फ्रेंड्स लायब्ररी, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, आम्ही डोंबिवलीकर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयोजित हा उपक्रम शुक्रवार, दिनांक १९ जानेवारी २०२४ ते रविवार, दिनांक २८ जानेवारी २०२४ दरम्यान सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराथी, बंगाली, तमिळ, तेलुगू, ओडिसी, पंजाबी अशी बहुभाषिक पुस्तके लाखोंच्या संख्येने मांडण्यात आली होती. या प्रदर्शनात विज्ञान आणि वैज्ञानिक या विषयांवरील पुस्तके, कट आऊट, सुभाषिते दर्शवती मांडण्यात आली. या सर्वात रोज किमान हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
यंदाचे विशेष आकर्षण : वाचकांना पुस्तकांच्या सान्निध्यात आणण्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीने ६२ हजार ५०० पुस्तकांची जगातील पहिली भव्यदिव्य अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. डोंबिवली व अन्य परिसरातील २ लाखांहून अधिक वाचकांनी आणि १५००० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास भेट दिली. त्याचबरोबर या सोहळ्यात २२ जानेवारी २०२४ या दिवशी सामूहिक श्रीरामरक्षास्रोत पठणामध्ये १००० शालेय विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. दिवसाला कमीतकमी २००० वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यंदाचा विषय “विज्ञान आणि वैज्ञानिक” असल्याने या विषयातील पुस्तके, कटआऊट, सुभाषिते दर्शवली गेली. असा हा पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन सोहळा २०२४ ज्याकडे वाचनसंस्कृतीतील नवा प्रयोग म्हणून पाहिले जाते. अशा या संपन्न उपक्रमांमुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढतेय, यात तिळमात्र शंका नाही.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…