ऐकलंत का!: दीपक परब
मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील कलाकारांनी गेट वे ऑफ इंडिया येथे क्रुझवर ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला. त्यानिमित्ताने ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी पत्रकार मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल केली.
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ऋताला परदेशात नोकरी करून आयुष्य सुखकर करायचे आहे. त्यासाठी तिला तिच्या मित्रांची साथ हवी आहे; परंतु या सगळ्यात तिचे मित्र तिला साथ देणार का? तिचे हे स्वप्न अधुरे राहून तिला मायदेशी परतावे लागणार का? याचे उत्तर ८ मार्चला मिळणार आहे.
टीझरवरून हा चित्रपट मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे दिसत आहे. त्यात प्रेम, मैत्री, स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या कथेला विनोदाची आणि भावनांचीही जोड आहे. सनी राजानी, अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…