Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाIND vs ENG: यशस्वी जायसवालने राजकोटमध्ये केली धमाल

IND vs ENG: यशस्वी जायसवालने राजकोटमध्ये केली धमाल

मुंबई: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने आपल्या जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. यशस्वीने भारताच्या दुसऱ्या डावात नाबाद २१४ धावा केल्या. यशस्वी या दरम्यान २३६ बॉलचा सामना केला. यात १४ चौकार आणि १२ षटकार ठोकले.

गांगुलीने याबाबतीत पछाडले

यशस्वी जायसवालने या खेळी दरम्यान रेकॉर्ड्स बनवले. यशस्वी जायसवालने कसोटीत दुहेरी शतक ठोकले. याआधी विनोद कांबळीला अशी कामगिरी साधता आली होती. विराट कोहलीनेही सलग दोन सामन्यांत दुहेरी शतक ठोकले होते.

यशस्वी माजी कर्णधार विराट कोहली आणि वीनू मांकडनंतर कसोटी मालिकेतील एकाहून अधिक दुहेरी शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथील कसोटी सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. यशस्वी जायसवालने सध्याच्या कसोटी मालिकेत ५४५ धावा केल्या आहेत. यशस्वीने सौरव गांगुलीला मागे टाकले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या २००७च्या मालिकेत ५३४ धावा केल्या होत्या.

भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा

५४५ यशस्वी जायसवाल विरुद्ध इंग्लंड २०२४
५३४ सौरव गांगुली विरुद्ध पाकिस्तान २००७
४६३ गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००८
४४५ गौतम गंभीर विरुद्ध न्यूझीलंड २००९

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -