चार जणांचा जागीच मृत्यू तर दहाजण गंभीर जखमी
अमरावती : अमरावतीतील (Amravati) नांदगाव खंडेश्वर महामार्गावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात (Accident News) झाला. खासगी बस आणि सिमेंट मिक्सरचा धडक झाल्याने हा अपघात झाला. यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदगाव-खंडेश्वर आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सकाळच्या सुमारास क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी तरुणांचा एक गट एका खासगी बसमधून यवतमाळला निघाला होता. यावेळी खासगी बस सिमेंट मिक्सरच्या ट्रकला जाऊन आदळली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. या महामार्गावरील अपघातांची संख्या वाढतच आहे. रस्त्यावर खड्ड्यांची संख्या देखील जास्त आहे. सध्या गावागावात क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. त्यासाठी १४ तरुणांचा एक संघ क्रिकेट खेळण्यासाठी यवतमाळ येथे बसमधून जात होता. यावेळी हा दुर्दैवी अपघात झाला.