Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीISRO Mission : इस्रोची यशस्वी भरारी! इनसॅट-३डीएस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO Mission : इस्रोची यशस्वी भरारी! इनसॅट-३डीएस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन इनसॅट-३डीएस या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी हा उपग्रह लाँच करण्यात आला.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) इनसॅट-३ डीएस या हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आंध्र-प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून शनिवारी (दि.१७) सायंकाळी ५.३५ वाजता इनसॅट-३ डीएस हा उपग्रह जीएसएलव्ही-एफ१४ रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित झाला. या वर्षातील इस्रोची ही दुसरी महत्त्वपूर्ण मोहिम आहे. भारतीय हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळावी, यासाठी इस्रोकडून ही मोहीम आखण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली.

जीएसएलव्ही-एफ१४ या वाहनाने इनसॅट-३ डीएस या हवामानविषयक उपग्रहाला अपेक्षित जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या ठेवले आहे, अशी माहिती इस्रोने एक्स पोस्ट करत दिली आहे. हवामानविषयक निरीक्षणे, हवामान अंदाज आणि आपत्ती चेतावणीसाठी जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे. उपग्रह सहाय्यित शोध आणि बचाव सेवा प्रदान करणे. तसेच विद्यमान कार्यरत इनसॅट-३ डीएस आणि इनसॅट-३ डीआर उपग्रहांद्वारे प्रदान केलेल्या सेवांचे सातत्य सुनिश्चित करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.

जीएसएलव्ही-एफ१४ रॉकेटद्वारे इनसॅट-३ डीएस हा हवामान उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत ठेवेला जाणार आहे. इनसॅट-३ डीएस हा उपग्रह इन्सॅट मालिकेतील प्रक्षेपित केला जाणारा तिसरा उपग्रह आहे. हवामान आणि नैसर्गिक आपत्तींच्या अचूक माहितीसाठी ही मोहिम सुरू करण्यात येत आहे. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी तयार करण्यात आला असून, मोहिमेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केला आहे. हे प्रक्षेपण अंतराळाच्या जगात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

इनसॅट-३ डीएस हा हवामानविषयक उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हवामान उपग्रह इनसॅट-३ डीएसज्या उपग्रहातून प्रक्षेपित केला त्या जीएसएलव्ही-एफ१४ रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असेही म्हणतात. याचाच अर्थ खोडकर मुलगा असा आहे. जीएसएलव्ही-एफ१४ चे हे १६ वे मिशन असणार आहे. यापूर्वी जीएसएलव्ही-एफ१४ द्वारे प्रक्षेपित केलेल्या ४० टक्के मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. इस्त्रोने सांगितले की आज प्रक्षेपित होणारा हवामान उपग्रह इनसॅट-३ डीएस २०१३ मध्ये प्रक्षेपित केलेल्या हवामान उपग्रह इनसॅट-३ डीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. हा उपग्रह हवामानाची सविस्तर माहिती प्रदान करेल, असा विश्वास देखील भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोन व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -