
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आशावाद
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे ग्रामीण आर्थिक मंच अंतर्गत, महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद स्वामी, महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद पुरी, स्वामी चिदानंद सरस्वती, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे ज्येष्ठ प्रचारक यांसारख्या मान्यवर संतांच्या उपस्थितीत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी स्मार्ट आणि शाश्वत गौशाळा (एसएसजी) चे आयोजन करण्यात आले होते.
एसएसजी अंतर्गत, देशभरातील निराधार आणि असहाय्य गायींचे पुनर्वसन केले जाईल, ज्यामुळे गायींना सुंदर आणि चांगले जीवन मिळेल आणि आपल्या माता गायी ग्रामीण अर्थव्यवस्थेचे केंद्र बनतील. @IChamberOrg चा हा नवीन उपक्रम आपल्या ग्रामीण भागात गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि शाश्वत व्यवसाय मॉडेल्सना प्रोत्साहन देईल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.
गाईवर आधारित उद्योगांचा अवलंब केल्याने ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील, ज्यामुळे स्वावलंबी आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असा आशावाद या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आशिष गौतम, आयएमएचे माजी प्रमुख डॉ. सहजानंद प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर आणि विचारवंत उपस्थित होते.