‘बुड्ढी के बाल’मुळे कॅन्सरचा धोका
नवी दिल्ली : लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडणारी कॉटन कँडी (Cotton Candy) च्या विक्रीवर तामिळनाडू (Tamilnadu) तसेच पुद्दुचेरी (Puducherry) मध्ये बंदी घालण्यात आली आहे. निर्मितीमध्ये विषारी रसायनांचा वापर आढळून आल्याने ‘बुड्ढी के बाल’ (Budi Ke Baal) म्हणजेच कॉटन कँडी वर बंदी घालण्यात आली आहे.
पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी एका व्हिडिओमध्ये बंदीची घोषणा केली. तसेच राज्यपालांनी जनतेला मुलांसाठी कॉटन कँडी खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये, तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी खुलासा केला की, कॉटन कँडीमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रोडामाइन-बी हा विषारी पदार्थ आढळला आहे.
क्लिपसोबत, त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “मुलांसाठी रासायनिक कॉटन कँडी खरेदी करू नका. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो…” नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ नुसार, रोडामाइन बी हे सहसा आरएचबी म्हणून संक्षिप्त केले जाते आणि ते एक रासायनिक संयुग आहे जे रंग म्हणून कार्य करते.
रोडामाइन बी अन्नामध्ये मिसळल्यावर ते शरीरात पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करते. इतकंच नाही तर रोडामाइन बीचा दीर्घकाळ वापर केल्यास यकृत आणि कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात.