Thursday, April 24, 2025
Homeदेशकाँग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या संपर्कात

काँग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या संपर्कात

नवी दिल्ली : काँग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्याने काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर आहेत. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी एक्स (ट्विटर)वरुन काँग्रेस पक्षाचे नाव काढले आहे. त्यामुळे या वृत्ताला आणखी बळ मिळाले आहे.

गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असताना महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशमध्येही कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर ऐन लोकसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा फटका असेल.

मिळालेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कमलनाथ यांच्यासोबत दहा आमदार आणि तीन महापौरही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांच्यासोबत त्यांचा मुलगा खासदार नकुलनाथही भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी कमलनाथ यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जर मध्य प्रदेशमधील कोणता नेता समाजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचे स्वागत आहे. कमलनाथ यांना भाजपसोबत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपची दारं खुली आहेत. काँग्रेसने राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारले होते. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते नाराज होते. काँग्रेसने भगवान रामाचा अपमान केला, त्याचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांना दु:ख झाले. ज्यांना त्याचे वाईट वाटले, त्यांना संधी द्यायला हवी. ज्यांना राजकारणात राहून विकास करायचा आहे, ते जर आमच्यासोबत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे शर्मा म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -