मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी (Sunny Leone) अनेक रिॲलिटी शोचा चेहरा बनली आहे. “ग्लॅम फेम सीझन १” ची ती आता जज बनली आहे. सनी या आगामी शोसह पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ईशा गुप्ता आणि नील नितीन मुकेश यांच्यासोबत ती या शोला जज करणार आहेत. या शोमध्ये डब्बू रत्नानी, रोहित खंडेलवाल, दिनेश शेट्टी आणि संतोषी शेट्टी यांच्यासह काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. ग्लॅम फेम शो आणि जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया वरून यांनी ही बातमी दिली आहे.
ग्लॅम फेम शो हे ग्लॅम फॅशनच्या जगात ठसा उमटवू इच्छिणाऱ्या आणि जागतिक स्तरावर लोकांना व्यासपीठ मिळवून देणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्री ने सनी लिओनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात असे म्हटले आहे की, “ग्लॅम फेम सीझन – १ जज”
View this post on Instagram