Saturday, May 17, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Ravichandran Ashwinने ५०० विकेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

Ravichandran Ashwinने ५०० विकेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

मुंबई: राजकोटमध्ये भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला. रवी अश्विनने कसोटी सामन्यात ५०० विकेट घेण्याची किमया साधली आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये ५०० विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याच्या या यशाबद्दल रवीचंद्रन अश्विनला सचिन तेंडुलकरसह क्रिकेट जगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी अभिनंदन केले. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, रवी अश्विनने ५०० विकेट घेण्याचे जे काही यश मिळाले त्यासाठी अभिनंदन! रवी अश्विनचा प्रवास आणि त्याचे यश हे त्याचे कौशल्य आणि दृढतेचे प्रमाण आहे. आगामी दिवसांत तो आणखी किर्तीमान होईल. माझ्याकडून त्याला शुभेच्छा. सोशल मीडियावर मोदींचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर रवी अश्विन सातत्याने ट्रेंड करत आहे.


 


जॅक क्राऊलीला बाद करत अश्विनने रचला इतिहास


रवी अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊलीला बाद करत कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेटचा आकडा मिळवला. रवी अश्विनच्या आधी माजी क्रिकेटर अनिल कुंबळेने कसोटी सामन्यात ५०० विकेट घेण्याची किमया साधली होती. रवी अश्विन कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेट घेणारा जगातील ९वा गोलंदाज आहे. आतापर्यंत अश्विनने ९८ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ५०० बळी मिळवले.

Comments
Add Comment