Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताय? तर जरूर करा ही ३ कामे

शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताय? तर जरूर करा ही ३ कामे

मुंबई: अनेकदा एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडते मात्र त्याआधी कोणता ना कोणता अडथळा त्याच्यासमोर येतो. ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे की शुभ कमासाठी घराबाहेर पडताना आपल्याला ३ गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. यामुळे ती कामे पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते.

जर तुम्ही परीक्षेसाठी अथवा नोकरी जॉईन करण्याच्या हेतून बाहेर पडत आहात तर घरातून बाहेर पडताना श्री गणेशाय नम: असे जरूर बोला.असे बोलून दुसऱ्या दिशेने निघा. यामुळे तुमच्या कार्यात बाधा येणार नाही.

शुभ कामासाठी घरातून बाहेर निघताना गूळ आणि पाणी जरूर प्या. यामुळे काम सफल होण्याची शक्यता वाढते.

कोणत्याही महत्त्वाच्या आणि चांगल्या कामसाठी घरातून बाहेर पडताना एक चांगला उपाय जरूर करा. हा उपाय केल्याने फायदा होतो. शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना दही-साखर खाऊन जा. यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या कामात यश मिळते.

आठवड्यातून कोणत्याही दिवशी शुभ कार्याला जाण्याआधी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. सूर्यदेवाची पुजा खूप कल्याणकारी मानली जाते.

Comments
Add Comment