Sunday, July 14, 2024
Homeदेशजेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना कॅन्सर, उपचारासाठी न्यायालयाकडून मागितला जामीन

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना कॅन्सर, उपचारासाठी न्यायालयाकडून मागितला जामीन

नवी दिल्ली: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल(naresh goyal) यांना कॅन्सर झाला आहे. त्यांनी गुरूवारी मुंबईच्या स्पेशल कोर्टासमोर याचिका दाखल करत या आजाराच्या उपचारासाठी अंतरिम जामीन देण्याची विनंती केली आहे. नरेश गोएल यांच्या या आजाराचा खुलासा खाजगी डॉक्टरांनी केलेल्या टेस्टदरम्यान झाला आहे. दरम्यान, त्यांना तातडीने जामीन मंजूर झालेला नाही आणि मंगळवारी २० फेब्रुवारीपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

गुरूवारी कोर्टात काय घडले?

जेए एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल यांनी १५ फेब्रुवारीला न्यायालयात सांगितले की हळू वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरच्या उपचारासाठी जामीन हवा आहे. यानंतर गोएल यांच्या मेडिकल रिपोर्टची तपासणी करण्यासाठी मेडिकल बोर्ड बनवण्याचे सुरूवातीचे आदेश देण्यात आले आणि हे प्रकरण २० फेब्रुवारीला पाहिले जाईल.

खंरतर अंमलबजावणी संचलनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात नरेश गोएल यांच्या जामीन याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता. याच्या उत्तरादाखल मुंबई कोर्टाने २० फेब्रुवारीपर्यंत मेडिकल बोर्डाला आपले रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती जीएस देशपांडे यांनी मेडिकल बोर्डाला असेही आदेश दिलेत की गोएल यांच्या आजाराची माहिती मिळवावी आणि त्यावर उपचार सरकारी रुग्णालयात होतील की नाही हे ही सांगावे.

जानेवारीत देण्यात आली होती मेडिकल चेकअपची परवानगी

गेल्या महिन्यात विशेष न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी नरेश गोएल यांना खाजगी डॉक्टरांकडून मेडिकल चेकअपसाठी परवानगी दिली होती.

काय आहे प्रकरण?

ईडीने सीबीआयद्वारे दाखल केलेल्या एफआयआरच्या धारावर सुरू केल्या गेलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात १ सप्टेंबरला नरेश गोएल यांना अटक केली होती. सीबीसीआयने हे प्रकरण कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर दाखल केले होते. यात ७०००० कोटी रूपयांपेक्षा अधिक फसवणुकीचा आरोप नरेश गोएल यांच्यावर होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -