Sunday, July 21, 2024
Homeदेशहवामान उपग्रहासाठी इस्त्रो सज्ज

हवामान उपग्रहासाठी इस्त्रो सज्ज

इनसॅट-३डीएसचे उद्या होणार प्रक्षेपण

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) यावर्षातील दुसरी महत्त्वाची मोहिम हाती घेतली आहे. इस्रोच्या हवामानविषयक उपग्रह इनसॅट-३डीएसचे शनिवारी जीएसएलव्ही एफ१४ सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३५ वाजता, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे, असे इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून सांगितले आहे.

इस्रोच्या इनसॅट-३डीएस या हवामानविषयक उपग्रहाने बंगळूरमधील यूआर राव उपग्रह केंद्रात उपग्रह संयोजन, एकत्रीकरण आणि उपक्रम चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तसेच पुढे इस्त्रोने एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जीएसएलव्ही’एसच्या या १६ व्या मोहिमेत लक्ष्य निर्धारित केले आहे. इनसॅट-३डी हा उपग्रह हवामानशास्त्र आणि आपत्ती चेतावणीशी संबंधित आहे. या मोहिमेला संपूर्णपणे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून निधी दिला जाणार असल्याचे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.

इनसॅट 3डीएस हा एक अद्वितीय हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. ज्याचा प्राथमिक उद्देश सध्याच्या कक्षेत असलेल्या इनसॅट-3डी आणि ३डीआर उपग्रहांना सेवांची सातत्यता प्रदान करणे. इन्सॅट प्रणालीच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणे आहे. इस्रोचा हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयसह युजर्स अनुदानित प्रकल्प आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेस एजन्सी फेब्रुवारीच्या मध्यात प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -