मुंबई: शेंगदाण्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जर तुम्ही बदामाच्या जागी शेंगदाणे खाल तर त्याचे फायदे तुम्हाला मिळतात. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर आणि फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. शरीरास याचे अनेक फायदेही मिळतात. मात्र काही लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकते.
थायरॉईडच्या रुग्णांनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. जर तुम्हाला हायपोथायरॉईडचा त्रास आहे तर तुम्हाला चुकूनही शेंगदाण्याचे सेवन केले नाही पाहिजे. यामुळे त्रास वाढू शकतो.
ज्या लोकांना लिव्हरशी संबंधित त्रास आहे त्यांनीही शेंगदाणे खाऊ नयेत. शेंगदाण्यामध्ये असे काही तत्व असतात जे लिव्हरसाठी खूप नुकसानदायक ठरू शकतात. यामुळे लिव्हरवर मोठा परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ल्याने पचनसंस्था बिघडते. यामुळे अपचनाचा त्रास होतो.
काही लोकांना शेंगदाणे खाल्ल्याने स्किन अॅलर्जी सुरू होते. यामुळे अशा लोकांनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. शेंगदाणे खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास, स्किन अॅल्रजी, खाज सुरू होते. अशा व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन टाळावे.
शेंगदाण्यामध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात. यामुळे तुम्ही हे अधिक प्रमाणात खाल तर वजन वाढू शकते. अशा लोकांनी शेंगदाणे खाऊ नयेत.