Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीPrathmesh Parab Engagement: 'व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधत दगडूने उरकला साखरपुडा

Prathmesh Parab Engagement: ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधत दगडूने उरकला साखरपुडा

१४ फेब्रुवारी प्रथमेश-क्षितिजासाठी खास

मुंबई : मराठी कलाविश्वात (Marathi Industry) सध्या लगीनसराई सुरु आहे. अनेक तरुण कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यातच सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब (Prathmesh Parab) यानेही काही दिवसांपूर्वीच लग्न करत असल्याची घोषणा केली. आपल्या केळवणाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्याच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले.

यानंतर आता त्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’चा (Valentine Day) मुहूर्त साधत प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) साखरपुडा उरकला आहे. दोघांचा साखरपुडा काल थाटामाटात पार पडला असून या सोहळ्यातील काही खास फोटो प्रथमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन प्रथमेशने या फोटोंना दिलं आहे. यामध्ये प्रथमेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली आहे. चाहत्यांकडून या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

१४ फेब्रुवारी प्रथमेश-क्षितिजासाठी खास

प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रथमेशने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता. पुढे, बरोबर एक वर्षाने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी रिलेशनशिपला सुरुवात केली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथमेश-क्षितिजाने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होणार असल्याने या खास दिवशी साखरपुडा करण्याचा निर्णय प्रथमेशने जानेवारी महिन्यात घेतला होता.

प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. पुढच्या दहा दिवसांनी म्हणजे २४ फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -