अमेरिकेत भारतीय वंशाच्या वयोवृद्ध व्यक्तीची गोळी घालून हत्या, खोली भाड्याने देण्यावरून झाला होता वाद

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अलबामामध्ये खोली भाड्याने देण्यावरून झालेल्या वादात ७६ वर्षीय भारतीय वंशाचे प्रवीण रावजीभाई पटेल यांची गेल्या आठवड्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय विलियम जेरेमी मूर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.


शेफिल्ड पोलीस प्रमुख रिकी टेरी यांनी सांगितले की आरोपी मूरला घटनेनंतर तातडीने अटक करण्यात आले. तो १३व्या एव्हेन्यूवर एका निर्जन घरात लपण्याचा प्रयत्न करत होता.


मूर एक खोली भाड्याने घेण्यासाठी लेने मोटल येथे आला होता. या दरम्यान प्रवीण रावजीभाई आणि मूर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की मूरने पिस्तूल काढून वयोवृद्ध व्यक्तीला गोळी मारली. रस्त्याच्या बाजूला आश्रयासाठी तसेच राहण्यासाठी छोटे हॉटेल्स असतात त्यांना मोटल म्हटले जात. मूर ८ फेब्रुवारीला हॉटेलची एक रूम भाड्याने घेण्यासाठी गेला होता. यावेळेस पटेल आणि त्यांच्यात वाद झाला.


पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहे. वॉरंट जारी होईपर्यंत मूरला शेफील्ड सिटी जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला कोलबर्ट काऊंटी जेलमध्ये आणले जाईल. पोस्टमार्टेम केल्यानंतर प्रवीण रावजीभाई पटेल यांच्यावर १२ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments
Add Comment

Middle East War : होर्मुजमधील इराणच्या कर वसुलीवरून ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून होर्मुज जलडमरूमध्य मार्गे होणाऱ्या तेल

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा मोठा निर्णय; इराणकडून पर्यायी समुद्री मार्ग जाहीर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या (Iran-US-Israel War) पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात एक मोठी

Iran-US-Israel War : बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा इस्त्रायलने केला दावा

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने