मुंबई: अनेकदा आपल्याला वॉर्डरोबमधून कप़डे शोधताना गोंधळ होतो. आपण ज्या कपड्यांचा शोध घेत असतो ते कपडे कपाटात कुठेतरी आत असतात. त्यामुळे सारेच कपडे अस्ताव्यस्त होतात. मात्र जर कपाट योग्य पद्धतीने लावले तर या समस्येपासून सुटका मिळू शकते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे कपाट लावू शकता.
कपड्यांना श्रेणीनुसार ठेवा
कपडे वेगवेगळ्या श्रेणीनुसार ठेवा. जसे टीशर्ट, जीन्स, शर्ट्स, स्कर्ट्स वेगवेगळे ठेवा. यामुळे तुम्हाला जेव्हा कधी कपडे वापरायचे असतील तुम्ही ते शोधू शकता. सर्व टी शर्ट एका जागी, जीन्स दुसऱ्या जागी असे ठेवा. यामुळे पटापट कपडे मिळतील. तसेच तुमचा वेळही वाचेल.
रंगाच्या हिशेबाने शब्द निवडा
जेव्हा तुम्ही कपडे विविध पद्धतीने ठेवत असाल तर ते रंगाच्या हिशेबाने सजवा. सर्व लाल कपडे एकत्र, सफेद वेगळे. यामुळे तुम्हाला जेव्हा एखाद्या खास रंगाची शर्ट अथवा पँट हवी असेल तर ती लगेचच सापडेल.
हँगर्सचा वापर करा.
शर्ट्स, जॅकेट्स आणि ड्रेसेस हे कपडे हँगर्सवर लावा. यामुळे कपडे खराब होणार नाही आणि तुम्ही सहज शोधू शकता. याशिवाय हँगर्समुळे कपाटातील जागाही वाटते.
छोट्या कप्प्यांचा वापर
छोटे कपडे अंडरगारमेंट्स, मोजे, बेल्ट्स छोट्या कप्प्यात ठेवा. यात तुम्ही विभाजकाचा वापर करू शकता.
वेगवेगळ्या हंगामातील वेगवेगळे कपडे
जे कपडे तुम्ही ऋतुनुसार वापरता ते वेगळ्या ठिकाणी ठेवा. जे रोजचे वापरत नाही ते वेगळे ठेवा. यामुळे वॉर्डरोबमधील जागा वाचेल. रोजचे कपडे लगेचच सापडतील.