Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीCongress : काँग्रेसही फुटणार? महत्त्वाच्या बैठकीला १२ आमदारांची अनुपस्थिती

Congress : काँग्रेसही फुटणार? महत्त्वाच्या बैठकीला १२ आमदारांची अनुपस्थिती

मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) राज्यसभा (RajyaSabha) आणि लोकसभा निवडणुकींची (Loksabha Elections) तयारी करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व सहा जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) ठरवण्यासाठी काल विधानभवनात काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एकूण आमदारांपैकी १२ आमदार बैठकीसाठी उपस्थित नसल्याने काँग्रेसमध्येही फोडाफोडीचा खेळ होणार का? याची चर्चा रंगली आहे.

नुकतीच काँग्रसेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रसेची अनेक वर्षांची साथ सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार देखील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का असणार आहे.

काँग्रसेच्या कालच्या बैठकीला केवळ २५ आमदार उपस्थित होते. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली. २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, आज देखील काँग्रेस आमदारांची विधानभवनात सकाळी साडेनऊला बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत, तरी सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -