
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(akshay kumar) सध्या आपल्या आगामी चित्रपट बडे मियां छोटे मियां याबाबत चर्चेत आहे. यात तो टायगर श्रॉफसोबत धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. यातच अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अबूधाबीचा आहे. यात अभिनेता हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी पोहोचला आहे.
अबूधाबीमध्ये पोहोचला अक्षय कुमार
अबूधामीमध्ये आज म्हणजेच १४ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू मंदिराचे उद्घाटन करत आहेत. या सोहळ्यात अक्षय कुमारने हजेरी लावली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार पारंपारिक पोषाखात दिसत आहे.
#WATCH | Actor Akshay Kumar arrives at Abu Dhabi BAPS temple to be inaugurated by PM Modi today pic.twitter.com/pX3PsWmgqI
— ANI (@ANI) February 14, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मंदिराचे उद्घाटन
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओत अक्षय कुमार ऑफ व्हाईट प्रिंटेड कुर्ता घातलेला दिसत आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत मंदिरेत शिरताना दिसत आहे. प्रवेश करताना तो हसत आहे.
या सिनेमात दिसणार अक्षय़ कुमार
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अक्षय कुमार शेवटच्या मिशन रानीगंज या सिनेमात दिसला होता. यात तो अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत दिसला होता. २०२४मध्ये अक्षय कुमारचे तीन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. यात तो वेलकम टू जंगल, बडे मियां छोटे मियां आणि हेराफेरी ३ यांचा समावेश आहे.