Monday, November 11, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2024: रोहित शर्मा होणार टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार

T20 World Cup 2024: रोहित शर्मा होणार टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई: या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup) टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हातात असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाहने रोहित शर्माला टी-२० वर्ल्डकपसाठी कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

जय शाह यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकप जिंकणे गरजेचे आहे. जय शाहने गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपमध्ये केलेल्या टीम इंडियाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जय शाह यांनी कन्फर्म केले की रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. जय शाहने राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी सांगितले, भले आम्ही २०२३च्या वनडे वर्ल्डकपमधील फायनल सामना हरलो असलो तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी राहिली.

भारताने सलग १० सामने जिंकले. मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -