Saturday, June 21, 2025

Rajya Sabha Elections 2024 : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Rajya Sabha Elections 2024 : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे राज्यसभेच्या रिंगणात


मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभा (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र काँग्रेसकडून (Maharashtra Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.


चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.





काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. तर बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

Comments
Add Comment