मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने(Poonam pandey) काही दिवसांपूर्वी सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपला मृत्यू झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेत्रीला या खराब पब्लिसिटी स्टंटटसाठी ट्रोलही करण्यात आले होते. दरम्यान, अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले होते की तीने आपल्या मृत्यूची खोटी अफवा सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी पसरवली होती. मात्र पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या प्रकरणी चांगलाच अडचणीत सापडताना दिसत आहे. अभिनेत्री आणि तिच्या पतीवर मानहानिचा खटला दाखल करण्यात आला आहे.
पूनम पांडेविरोधात मानहानीचा खटला
पूनम पांडेद्वारे आपल्या मृत्यूची खोटी कहाणी रचल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री आणि तिचा माजी पती सॅम बॉम्बेविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
पूनम पांडेने इन्स्टावर शेअर केली होती मृत्यूची खोटी अफवा
पूनम पांडेने आपल्या मृत्यूची खोटी अफवा २ फेब्रुवारीला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करून केली. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत ही अफवा शेअर केली होती. यात लिहिले होते की ही सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला सांगताना खेद होत आहे की आम्ही सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्या प्रिय पूनमला गमावले आहे. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तिचे प्रेम मिळाले. दु:खाच्या या क्षणी आम्ही प्रायव्हसीची रिक्वेस्ट करत आहोत.
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीने व्हिडिओ स्टेटमेंट करत खुलासा केला की ती जिवंत आहे. तिने तर्क दिला की तिच्या मृत्यूची बातमी देण्यामागे सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती पसवणे होता. दरम्यान, अभिनेत्रीचा पब्लिसिटी स्टंट कोणाला आवडला नाही. अनेकांनी तिच्यावर टीका केली.