Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीनविन नाशिक सकल मराठा समाज तर्फे त्रिमूर्ती चौकात बोंबाबोंब आंदोलन

नविन नाशिक सकल मराठा समाज तर्फे त्रिमूर्ती चौकात बोंबाबोंब आंदोलन

नवीन नाशिक : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच एक दिवशीय बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

यावेळी आशिष हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येत्या दिवसात जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही किंवा त्यांच्या तब्येतीला काही बरे वाईट झाले तर नविन नाशिक सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, त्यानंतर होणा-या सर्व परिणामांची जबाबदारी ही सरकारची असेल.

आजच्या आंदोलनात नविन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील, संजय भामरे, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राम पाटील, जितेंद्र पाटिल, योगेश पाटील, गोपी पगार, विशाल पगार, गौरव भदाने, हर्षद पाटिल, शुभम महाले, राहुल काकळीज, योगेश आहीरे, हरीश शेवाळे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -