Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

MLA disqualification case : ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर सुनावणी

MLA disqualification case : ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर सुनावणी

आमदार अपात्रता निकालानंतर दाखल केली होती याचिका


नवी दिल्ली : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे व ठाकरे गटातील (Thackeray Group) संघर्ष टिपेला पोहोचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आमदार अपात्रतेचा (MLA disqualification case) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या हाती सोपवला होता. मागच्याच महिन्यात हा निकाल लावत नार्वेकरांनी कोणत्याही पक्षाचे आमदार अपात्र न ठरवता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, या प्रकरणात सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून थेट राज्यसभा निवडणुकीनंतरची (Rajyasabha Elतारीख जाहीर करण्यात आली आहे. १ मार्च रोजी ही सुनावणी पार पडणार आहे.


देशभरात राज्यसभेच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यानंतर ठाकरे गटाच्या याचिकेवर १ मार्च २०२४ रोजी सुनावणी पार पडेल. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) हे न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला आहे. या प्रकरणी न्यायालय कोणता ऐतिहासिक निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.



निकालानंतर राहुल नार्वेकर काय म्हणाले होते?


"मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसारच निकाल दिला. भारतातील कोणत्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे", अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर दिली होती. नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे गटाशिवाय शिवसेना शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

Comments
Add Comment