Tuesday, July 1, 2025

Eng vs Ind: ३ स्पिनर, २ वेगवान राजकोट कसोटीत अशी आहे इंग्लंडची प्लेईंग ११

Eng vs Ind: ३ स्पिनर, २ वेगवान राजकोट कसोटीत अशी आहे इंग्लंडची प्लेईंग ११

मुंबई: इंग्लंड क्रिकेट संघाने राजकोटमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत खेळणाऱ्या मार्क वूडचे संघात पुनरागमन झाले आहे.


तर विशाखापट्टणम कसोटीत पदार्पण करणाऱ्या शोएब बशीरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एकूण मिळून हाच एक मोठा बदल बेन स्टोक्सने तिसऱ्या कसोटीत केला आहे. अशातच आता इंग्लंडच्या संघात २ वेगवान आणि ३ स्पिनर असलीतल. वेगवान गोलंदाजांमध्ये संघात मार्क वूडसह जेम्स अँडरसनसोबत मोर्चा सांभाळेल. तर स्पिन गँगमध्ये रेहान अहमद, टॉम हार्टले आणि ज्यो रूट असतील.



का बाहेर गेला शोएब बशीर


विशाखापट्टणममध्ये शोएब बशीरने आपल्या पदार्पणात चांगली कामगिरी केली नाही. त्याला ४ विकेट मिळाले खरे मात्र तो लयीत दिसला नाही. शोएब बशीरने पहिल्या डावात ३८ ओव्हर गोलंदाजी केली. त्याला एकूण तीन विकेट मिळाल्या.


राजकोट कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेईंग ११- जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, बेन स्टोक्स(कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वूड, जेम्स अँडरसन,


तिसऱ्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य प्लेईंग ११- रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन दिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल/केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.g

Comments
Add Comment