नवी दिल्ली: अंमलबजावणी संचलनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना सहाव्यांदा समन्स जारी करताना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीस्थित ईडीच्या प्रमुख कार्यालयात सादर होण्यास सांगितले आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र एकदाही ते तपासात सामील झालेले नाहीत.
याआधी २ फेब्रुवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर पाचव्या समन्सनंतरही चौकशीसाठी सामोरे गेलेले नाहीत. यानंतर ईडीने समन्स न पाळल्याबद्दल त्यांच्याविरोधात आणखी एक केस दाखल केली आहेत.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे हे समन्स अवैध आणि राजकीय प्रेरणेने असल्याचे सांगितले होते. ईडीचा उद्देश केवळ निवडणुकीचा प्रचार कऱण्यापासून रोखणे हा होता असा आरोप केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर २०२३ला समन्स जारी केले होते. मात्र राजकीय हेतूने असल्याचे सांगत त्यानी दुर्लक्ष केले होते. ईडीसमोर सादर होण्याऐवजी मध्य प्रदेशात सिंगरौलीमध्ये सभा घेतली होती. यानंतर ईडीने नोटीस जारी करत २१ डिसेंबर २०२३ला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस पंजाबच्या होशियापूरमध्ये ते एखाद्या कार्यक्रमात होते त्यावेळीही ते सादर होऊ शकले नाहीत.
त्यानंतर ३ जानेवारी, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र ते सादर झाले नाहीत.