पंचांग
आज मिती माघ शुद्ध पंचमी शके १९४५. चंद्र नक्षत्र रेवती नंतर अश्विनी योग शुभ. चंद्र राशी मीन नंतर मेष. भारतीय सौर २५ माघ शके १९४५. बुधवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ७.०७ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.३८ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. १०.१८ वा., मुंबईचा चंद्रास्त स. ६.१५ वा. राहू काळ १२.५२ ते २.१९. वसंत पंचमी, श्री पंचमी, जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती.