Tuesday, July 1, 2025

Almonds: रोज खाल मूठभर भिजवलेले बदाम तर राहाल Fit and Fine

Almonds: रोज खाल मूठभर भिजवलेले बदाम तर राहाल Fit and Fine
मुंबई: सुक्या मेव्यांबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा बदामाला(almonds) सर्वाधिक पसंती मिळते. नट्समध्ये बदामला सर्वाधिक हेल्दी म्हटले जाते. खासकरून बदाम जर रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे आरोग्यस अधिक फायदे होतात.

पोषकतत्वांनी भरपूर असलेल्या बदामाचे सेवन दररोज केल्यास केवळ हृदयच नव्हे तर मेंदूचे आरोग्यही सुधारते. जाणून घेऊया भिजवलेल्या बदामाचे फायदे

बदामामध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात याच कारणामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवत हृदयाचे आरोग्य चांगले राखते. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियसोबतच फायबर आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय बदामामध्ये व्हिटामिन ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन बी, नियासिन, रायबोफ्लेविन इत्यादी घटक आढळतात.

जर बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खाल्ल्यास याचे पोषणतत्व दुपटीने वाढते. यामुळे आरोग्यास डबल फायदे मिळतात.

भिजवलेले बदाम हृदय निरोगी राखण्याचे काम करतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते तसेच भिजवलेले बदाम चांगले पचतात. यामुळे पोट साफ होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने पोटाच्या समस्या जसे गॅस, अपचन, ब्लोटिंगच्या समस्या तसेच पोटदुखीपासून सुटका मिळते.
Comments
Add Comment