Saturday, June 21, 2025

महिला एकत्र आल्याने विचारांची देवाण-घेवाण होते

महिला एकत्र आल्याने विचारांची देवाण-घेवाण होते

सौ. निलमताई राणे यांचे प्रतिपादन


वैभववाडी भाजपा कार्यालयात हळदीकुंकूला महिलांची मोठी गर्दी


वैभववाडी : हळदीकुंकू समारंभ निमित्त महिलांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होत असते. या निमित्त महिला मोठ्या संख्येने एकत्र येतात. या समारंभात गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे अशा समारंभात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा सौ. नीलमताई राणे यांनी व्यक्त केले.


वैभववाडी भाजपा कार्यालयात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिला भाजपा जिल्हाध्यक्षा कोरगावकर ताई, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, वैभववाडी महिला मोर्चा अध्यक्षा प्राची तावडे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती हर्षदा हरयाण, माजी सभापती शारदा कांबळे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, महिला पदाधिकारी, नगरसेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


सौ. नीलमताई राणे म्हणाल्या, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लागत आहेत, या विधायक कामाचा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी होत आहे, याचे फार समाधान आहे. गेली दहा वर्षे आमदार नितेश राणे यांच्यावर तुम्ही विश्वास टाकला. प्रेम दिले. जनतेसाठी तो यापुढेही गावागावात काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काम करणाऱ्यावरच टीका होत असते, त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे महिलांनी लक्ष देऊ नये. काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सदैव पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी कोरगावकर ताई, शारदा कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले. सौ निलमताई राणे यांचा प्राची तावडे यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांना वाण देऊन शुभेच्छा दिल्या.


सौ. नीलमताई राणे यांनी उपस्थित महिलांना हळदीकुंकू व वाण, भेटवस्तू वाटप केले व सर्व महिलांना या समारंभ निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभववाडी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा