Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची तंत्रज्ञान केंद्रे, विस्तारित केंद्रे आणि विकास आणि सुविधा कार्यालयांचे होणार उदघाटन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्या ग्रेटर नोएडा येथे एमएसएमई तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे एमएसएमई, खादी, ग्रामोद्योग, रेशीम उद्योग, हातमाग आणि वस्त्रोद्योगमंत्री राकेश सचान, देखील उपस्थित राहणार आहेत.

नारायण राणे उत्तर प्रदेश मधील कानपूर, हिमाचल प्रदेशमधील बद्दी आणि मणिपूरमधील इंफाळ येथील तीन तंत्रज्ञान केंद्रांचे उद्घाटन करतील. याशिवाय त्यांच्या हस्ते ओडिशा मधील करीमनगर आणि भवानीपटना येथील दोन विस्तार केंद्रांचेही दूरस्थ पद्धतीने उद्घाटन होणार आहे. उत्तराखंड मधील डेहराडून येथील डी सी (एमएसएमई)चे विकास आणि सुविधा कार्यालय आणि लडाख येथील विकास आणि सुविधा कार्यालय (न्यूक्लियस सेंटर) यांचेही यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या उद्घाटन होणार आहे.

याशिवाय एमएसएमईअंतर्गत विविध क्षेत्रातील उत्पादनांचे प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे. तसेच एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत उत्तर प्रदेश मधील विविध जिल्ह्यांचे विशेष स्टॉल्स, खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि कॉयर बोर्ड यांचेही स्टॉल्स उभारले जाणार आहेत. इनक्यूबेटर्स आणि महिला उद्योजकांना आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती मधील उद्योजकांना अनेक स्टॉल्सचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी 100 महिला उद्योजकांना एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत टूलकिटचेही वाटप करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17.09.2023 रोजी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली होती. एकूण 18 प्रकारच्या उद्योगांमधील कारागीर आणि शिल्पकारांसाठी सुरु केलेल्या या सर्वांगीण योजनेअंतर्गत त्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत पाठबळ पुरवले जाते. 11.02.2024 पर्यंत, या योजनेअंतर्गत एकूण 4,10,464 अर्जांची यशस्वी नोंदणी झाली आहे. या योजनेची जनजागृती करण्यासाठी या योजनेंतर्गत येत असलेल्या व्यापारउदीम आणि इतर गोष्टींसंदर्भात माहिती देणारे एक अनुभव केंद्र देखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -