Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीTips: काचेप्रमाणे चमकू लागेल बाथरूम, वापरा या टिप्स

Tips: काचेप्रमाणे चमकू लागेल बाथरूम, वापरा या टिप्स

मुंबई: बाथरूम(bathroom) हे प्रत्येक घरातील महत्त्वाची जागा आहे. याचा वापर दररोज केला जातो. आंघोळीपासून ते दैनंदिन क्रिया करण्यासाठी बाथरूमचा वापर होत असतो. मात्र दररोजच्या वापराने बाथरूम खराब होतो. फरशीवर डाग पडू लागतात. अशावेळेस हे डाग काढण्यासाठी भरपूर एनर्जी खर्च करावी लागते.

वापरा या टिप्स

तसे तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे क्लीनर उपलब्ध असतात ज्याने तुम्ही बाथरूमची साफसफाई करू शकता. मात्र आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे बाथरूम काचेप्रमाणे चमकवू शकता. याचे उत्तर बेकिंग सोडा.

बेकिंग सोड्याने डाग हटवा

बाथरूममध्ये लावलेला शॉवर हेड जर खराब झाला असेल तर बेकिंग सोड्याच्या मदतीने तुम्ही हे स्वच्छ करू शकता. बेकिंग सोडा आणि व्हिनेगारचा घोळ लावून तासभर तसेच ठेवा.

टाईल्स चमकवा

दररोजच्या वापराने तसेच पाण्यामुळे बाथरूमच्या टाईल्स खराब होतात. यासाठी बेकिंग सोडा चांगला पर्याय आहे. यासाठी डिशवॉश साबणासह बेकिंग सोड्याचा घोळ तयार करा. हे टाईल्सला लावून १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर स्क्रब अथवा ब्रशच्या मदतीने टाईल्स स्वच्छ करा. यामुळे तुमच्या टाईल्स एकदम चमकू लागतील.

काचेवरील डाग असे हटवा

बाथरूममध्ये आरसा असल्यास त्यावर पाण्याचे डाग पडून तो खराब होतो. याच्या सफाईसाठी बेकिंग सोडा फायदेशीर आहे. बेकिंग सोडा व्हाईट व्हिनेगारसोबत मिसळून घोळ तयार करा त्यानंतर कॉटनच्या कपड्याच्या मदतीने काच साफ करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -