मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तनाचा परिणाम मेषपासून ते मीन रास या १२ राशींवर पजत असतो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आधी सूर्य आणि शुक्र ग्रहाने आपले राशी परिवर्तन केले आहे. असे मानले जाते कूी सूर्य आणि शुक्राची स्थिती मजबूत असेल तर प्रेम,नाते आणि वैवाहिक जीवनात मधुरता येते. १४ फेब्रुवारीआधी शुक्र आणि सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप स्पेशल असणार आहे. जाणून घेऊया या ५ राशींबद्दल…
मेष रास
प्रेमसंबंधात मधुरता येईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. जोडीदाराकडून मानसिक सपोर्ट मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील.
मिथुन रास
नात्यात गोडवा येईल. सिंगल असणाऱ्यांची खास व्यक्तीशी भेट होईल. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण मिळतील. नात्यातील गैरसमज दूर होती.
कन्या रास
वैवाहिक जीवन आनंदमय राहील. नात्यातील जवळीक वाढेल. जोडीदारासोबत भावना शेअर कराल. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी शुभ दिन आहे.
तूळ रास
जोडीदारासोबत डिनरचा प्लान बनवा. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवाल. सोबत मिळून स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित राहाल. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल.