मुंबई: तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ राजकोटमध्ये पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी १० दिवस राजकोटमध्ये राहणार आहे, येथे टीम इंडियाचा खूप पाहुणचार केला जाईल.
भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी ११ फेब्रुवारीला राजकोटमध्ये पोहोचला होतो. आता रोहित ब्रिगेड २० फेब्रुवारीला येथून निघेल. टीम इंडियासाठी राजकोटमध्ये बरीच तयारी करण्यात आली आहे. येथे भारतीय खेळाडू सयाजी हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांचा चांगलाच पाहुणचार केला जात आहे. टीम इंडियाचे खेळाडू येथे गुजरात आणि सौराष्ट्रच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
हा आहे टीम इंडियाचा फूड मेन्यू
बीसीसीसीआयकडून खेळाडूंच्या खाण्याबाबत काही आदेश देण्यात आले होते. त्याच पद्धतीने खेळाडूंसाठी तयारी करण्यात आली आहे. भारतीय खेळाडूंना नाश्त्यामध्ये जिलेबी आणि फाफडा दिला जाईल. तर लंचमध्ये स्पेशल थाली असेल यात गुजराती पदार्थ असतील. तर डिनरमध्ये खेळाडूंना खाखरा, गाठिया, थेपला आणि दही टिकरी तसेच वाघेरेला असे पदार्थ असतील. सोबतच डिनरमध्ये खिचडी कढी आणि रोटलो यांचाही समावेश आ